भारताचे ऐतिहासिक स्मारक चारमीनार कोठे आहे हे माहिती आहे का?

गुरूवार, 20 मे 2021 (09:25 IST)
चारमीनार भारताच्या ऐतिहासिक स्मारकात समाविष्ट आहे. हे भारतातील एक प्रमुख आकर्षण आहे. या प्रभावी ऐतिहासिक स्मारकामागे एक कथा देखील दडलेली आहे.
याचे बांधकाम सुलतान मोहम्मद कुली कुतुब शाह यांनी1951 इसवी मध्ये करविले होते. सुलतान कुतुब हा राजघराण्याचा 5 वा शासक होता. हा मोहम्मद कुली कुतुब शाह इब्राहिम कुली कुतुब शाहचा तिसरा मुलगा होता. त्याने जवळजवळ 31 वर्षे गोलकोंडावर राज्य केले.
चार मिनाराचे बांधकाम या साठी करविले होते की गोलकोंडा आणि मछलीपट्टणम रस्त्याची जोडणी करता यावी. या मुळे व्यापारात वाढ होईल. चारमीनार हे कुतुब शाह आणि भगमती यांच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानले जाते.
 
चारमिनार ही हैदराबाद मध्ये आहे.चारमीनार दोन शब्दांनी बनलेले आहे. चार आणि मिनार.चारचा अर्थ आहे संख्या चार आणि मिनार म्हणजे टॉवर.अशा रित्या हा चारमिनार शब्द तयार झाला आहे. 
हे चारमिनार हैदराबाद च्या ऐतिहासिक व्यापार चौकाच्या मार्गावर आहे. त्याचा बांधकामात ग्रॅनाईट, संगमरमरी आणि मोर्टार साहित्य वापरले गेले. चारमिनार मध्ये भारत आणि  इस्लामी शैलीचे चित्रण  देखील केले आहे. याचे भव्य दरवाजे चारी वेगवेगळ्या रस्त्यावर उघडतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती