डायनासोर विलुप्त झाल्यानंतर बेडकांची उत्पत्ती

सुमारे 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून विशालकाय डायनासोर जवळपास तीन चतुर्थांश जीवनसृष्टी नष्ट झाली होती. डायनासोरचे समूळ उच्चाटन करणार्‍या प्रचंड उलथापालथीच्या या घटनेनंतर पृथ्वीवर मदत मिळाली होती, असे एका नव्या अध्ययनात आढळून आले आहे.
शास्त्रज्ञांनी या अध्ययनाच्या मदतीने बेडकांच्या विकास क्रमाशी संबंधित कोडे उलगडल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांना असे दिसून आले की त्याकाळी पृथ्वीवरून डायनासोरसह तीन- चतुर्थांश जीवन विलुप्त झाले होते.
 
त्यानंतर आ‍धुनिक बेडकांच्या तीन प्रजाती एकाच वेळी प्रकट झाल्या व विकसित होत गेल्या. ही घटना 6.6 कोटी वर्षांपूर्वींच्या क्रीटेशस कालखंडाची समाप्ती आणि पेलियोजीन काळच्ा प्रारंभाच्या वेळी झाली होती. अमेरिकेतील फ्लोरिडा म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे शास्त्रज्ञ डेव्हिड ब्लॅकबर्न यांनी सांगितले की डायनासोर पृथ्वीवरून नामशेष होईपर्यंत बेडकांची उत्पत्ती झाली नव्हती, असे या अध्ययनातून स्पष्ट होते.
 
त्याकाळी जंगले उद्ध्वस्त होण्यासह पर्यावरणामध्ये मोठे बदल घडून आले होते. अर्थात या बदलांमुळेच बेडकांना विकसित होण्यास मदत मिळाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा