5 श्लोक अर्थासहित, नक्की स्मरण करावे

सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (12:04 IST)
जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिम् ।
तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥
अर्थ : जास्वंदाच्या फुलाप्रमाणे कांती असलेल्या, कश्यपपुत्र, अत्यंत तेजस्वी, अंधकाराचा शत्रू, सर्व पापांचा नाश करणार्‍या सूर्याला मी नमस्कार करतो.
 
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे ।
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम: ॥
अर्थ : मृत्युंजय (मृत्यूवर विजय मिळवलेला), रुद्र (असुरांना ज्याची भीती वाटते), नीलकण्ठ (ज्याचा कंठ निळा आहे), शम्भु (कल्याणकारी), अमृतेश (अमृताचा स्वामी), शर्व (मंगलमय), महादेव (देवांमध्ये श्रेष्ठ) अशी विविध नावे असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करतो.
 
नमः शिवाय साम्बाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय योगिनां पतये नमः ॥
अर्थ : कल्याणकारी, पापांचे हरण करणारा, परमात्मा, शरण आलेल्यांचे सर्व क्लेश नष्ट नाहीसे करणारा, योगिजनांचा स्वामी अशा भगवान सांबसदाशिवाला अर्थात शंकराला नमस्कार असो.
 
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ॥
अर्थ : मुखकमलातून निर्माण होणार्‍या, शरद ऋतूतील कमलाप्रमाणे मोहक मुख असलेल्या हे शारदे तू आम्हाला सर्वकाळ सर्वकाही देणारी हो. आमच्या संनिध नेहमी निवास कर. आम्हाला चांगले सन्निधी देणारी हो.
 
संसारवृक्षमारूढाः पतन्ति नरकार्णवे ।
यस्तानुद्धरते सर्वान् तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : संसाररूपी झाडावर चढलेले जे नरकरूपी सागरात गटांगळ्या खातात त्या सर्वांचा उद्धार करणार्‍या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती