पंतप्रधानांचे अंगरक्षक काळे चष्मा का घालतात हे जाणून घ्या

बुधवार, 30 जून 2021 (08:20 IST)
आपण बरेचदा पाहिले असेलच, जेव्हा जेव्हा पंतप्रधान भाषण देतात किंवा रॅलीला जातात तेव्हा त्यांच्या मागे असलेले सुरक्षा रक्षक किंवा अंगरक्षक काळे चष्मा घालतात, परंतु आपण कधी असा विचार केला आहे का की पंतप्रधानांचे अंगरक्षक काळे चष्मे का घालतात चला तर मग जाणून घेऊ या.
 
  
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते, म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे कमांडो त्यांचे संरक्षण करतात. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये एसपीजीची स्थापना झाली होती.एसपीजी कमांडो पंतप्रधानांच्या सह चालतात किंवा उभे राहतात तेव्हा त्यांची दृष्टी सर्वत्र असते. कोणाला हे कळू नये की ते कुठे बघत आहे म्हणून हे अंगरक्षक काळे चष्मे घालतात.
 
 तसेच अचानक एखादा स्फोट झाला, बॉम्बचा स्फोट होतो किंवा गोळीबार सुरू झाला, तर थोड्या वेळेसाठी आपले डोळे बंद होतात, परंतु या अंगरक्षकांना डोळे उघडे ठेवावे लागतात.जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये.अशा परिस्थितीत हे काळे चष्मे उपयुक्त असतात.
 
तसेच आपण कमी प्रकाशामधून जास्त प्रकाशात आल्यावर काही सेकंदासाठी आपले डोळे मिटतात परंतु या अंगरक्षकांना त्यांचे डोळे नेहमी उघडे ठेवून चौकस राहावे लागते.आणि त्यात हा काळा चष्मा त्यांची मदत करतो. म्हणून पंतप्रधानांचे अंगरक्षक नेहमी डोळ्यांवर काळा चष्मा घालतात.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती