फरहान अख्तर, मृणाल ठाकुर, परेश रावल यांची मुख्य भूमिका असलेल्या तुफानचा अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 16 जुलै रोजी होणार ग्लोबल प्रीमिअर!

बुधवार, 16 जून 2021 (15:35 IST)
रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा, फरहान अख्तर निर्मित या सिनेमाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे, अमेझॉन प्राइम व्हिडीओ सादर करत असलेल्या या सिनेमात परेश रावल आणि मृणाल ठाकुर यांच्याही मुख्य भूमिका
 
मुंबई: अमेझॉन प्राइम व्हिडीओने आज तुफान या फरहान अख्तरची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित, प्रेरणादायी स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाच्या त्यांच्या स्ट्रीमिंग व्यासपीठावरील प्रीमिअरची तारीख जाहीर केली. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट (रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर) आणि आरओएमपी पिक्चर्स (राकेश ओमप्रकाश मेहरा) यांची निर्मिती असलेला तुफान हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. भारत आणि जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक सिनेमा 16 जुलै पासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. तुफान मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
 
भाग मिल्खा भाग या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी तुफान मधून एक दमदार पंच पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे.
 
तुफान मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जीवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.
 
'तुफान'सह एका अद्वितीय आणि प्रेरणादायी प्रवासासाठी सज्ज व्हा 16 जुलै रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती