सूर्य जयंती बद्द्ल जाणून घेऊ या

शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (09:45 IST)
*माघ शुक्ल सप्तमी दिवशी साजरे होईल रथ सप्तमी पर्व 
*दान-पुण्य करण्याचा दिवस रथसप्तमी 
Rath Saptami 2024: माघ शुक्ल सप्तमी दिवशी सूर्यदेव प्रकट झाले होते. या दिवसाला रथसप्तमी दिवस म्हणून साजरा करतात. अशी मान्यता आहे की या दिवशी दान-पुण्य केल्याने चांगले फळ प्राप्त होते. सप्तमी तिथीच्या दिवशी रथसप्तमी हा उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव वसंत पंचमीच्या दोन दिवसांनंतर येतो. 
 
2024 मध्ये कधी साजरे केले जाईल हे पर्व आणि या दिवशी काय करतात? चला जाणून घेऊ या 
वर्ष 2024 मध्ये रथसप्तमीचे पर्व 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवार या दिवशी साजरे केले जाईल.  
या दिवसाला इतर नावांनी पण ओळखले जाते. जसे की अचला सप्तमी, माघ सप्तमी, माघ जयंती, विधान सप्तमी, आरोग्य सप्तमी आणि सूर्य जयंती नावाने ओळखले जाते. या दिवशी सप्तमी तिथीचा प्रारंभ 15 फेब्रुवारीला 01.42 मिनिटांनी सुरु होईल तर तिथि समाप्ती 16 फेब्रुवारीला 12.24 मिनिटांनी होईल. 
 
Ratha Saptami 2024- या दिवशी काय करावे. 
1. सर्वात आधी पहाटे उठून स्नान करून व्रत संकल्प करणे. 
2. विधिविधान नुसार सूर्य देवांची पूजा करणे. 
3. या दिवशी स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने आयु, आरोग्य आणि संपत्तीची प्राप्ती होते. 
4. रथ सप्तमीच्या दिवशी दान-पुण्यचे महत्व आहे. 
5. या दिवशी भगवान सूर्य देवांना प्रसन्न करण्यासाठी उपासना केली जाते. 
6. मान्यतानुसार या दिवशी सूर्य देव दिव्या प्रकाशासोबत अवतरित झाले होते. 
7. कल्पवास करणाऱ्या भक्तांनी नदित दिवा प्रवाहित करण्यापूर्वी ‘नमस्ते रुद्ररूपाय, रसानां पतये नम:। वरुणाय नमस्तेस्तु’ या मंत्राचे उच्चारण करणे. 
8. त्यानंतर सूर्यदेवांची आरती करणे. 
9. माघ महिन्याच्या शुक्ल पक्ष सप्तमीला अर्क सप्तमी, रथ आरोग्य सप्तमी, अचला सप्तमी, माघी सप्तमी, सूर्य जयंती, रथ सप्तमी और भानु सप्तमी म्हंटले जाते. या दिवशी चांगले आरोग्य मिळावे म्हणून प्रार्थना केली जाते. 
10. रथ सप्तमी, आरोग्य, अचला सप्तमी या दिवशी मिठाचा प्रयोग करू नये. 
11. या दिवशी फक्त एक वेळेस जेवण करावे. 
12. भगवान सूर्यदेवांनी या दिवशी आपला प्रकाश प्रकाशित केला होता. म्हणून या दिवसाला  सूर्य जयंती पण संबोधले जाते या दिवशी सूर्य देवाचे मंत्र, पाठ, स्तोत्र वाचने पुण्यफलदायी मानले जाते. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती