काल भैरव जयंती यंदाच्या वर्षी 7 डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार दर वर्षी कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षाच्या अष्टमीला काल भैरव जयंती साजरी केली जाते. या दिवसाला कालाष्टमी म्हणून देखील ओळखतात. शास्त्रानुसार भगवान काल भैरवांचा जन्म कार्तिक कृष्णपक्षाच्या अष्टमीला झाला होता. या दिवशी विधिविधानाने काल भैरवाची पूजा केली जाते. त्यांचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी मिळविण्यासाठी काही विशेष उपाय केले पाहिजे.
या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यानं भगवान भैरवाचे आशीर्वाद मिळतात, कारण भगवान भैरवाचा जन्म भगवान शिवाचा एक अंश म्हणून झाला होता. कालाष्टमीला 21 बिल्वपत्रांवर चंदनाने 'ॐ नम: शिवाय' लिहून शिवलिंगावर अर्पण करा. या विधीने पूजा केल्यानं भगवान भैरव बाबा प्रसन्न होतील आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होतील.
काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान भैरवाच्या देऊळात जाऊन शेंदूर, मोहरीचे तेल, नारळ, चणे, फुटाणे, पुए आणि जिलबी अर्पण करून भक्तिभावाने पूजा करावी.