तुळशीची 8 नावे - पुष्पसारा, नंदिनी, वृंदा, वृंदावनी, विश्वपुजिता, विश्वपावनी, तुळशी आणि कृष्ण जीवनी.
तुळशीच्या पूजेत हे साहित्य ठेवणे आवश्यक आहे -
तुळशीच्या पूजेत तूप, निरांजनी, धूप, शेंदूर, चंदन, नैवेद्य आणि फुले अर्पण करतात. दररोज तुळशीची पूजा केल्याने घराचे वातावरण पूर्णपणे शुद्ध राहील. या झाडात अनेक घटक असे असतात ज्यामुळे जंत अजिबात जवळ येत नाही. स्वतः नारायण श्री हरी तुळशीला आपल्या डोक्यावर घालतात. ही मोक्षदायिनी आहे. म्हणून देवाच्या पूजेत, आणि नैवेद्यात तुळशीची पाने असणे महत्त्वाचे आहे.