संकष्टी चतुर्थी पूजा विधी आणि उपाय

गुरूवार, 3 डिसेंबर 2020 (06:17 IST)
संकष्टी चतुर्थीला गणपतीची दिवसाला दोनदा पूजा करण्याचे विधान आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने सुख-समृद्धी, आर्थिक संपन्नता आणि ज्ञान व बुद्धीची प्राप्ती होते. गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले गेले आहे म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि कार्य निर्विघ्न पार पडतात.
 
संकष्टी चतुर्थीला या प्रकारे करा पूजा
- संकष्टी चतुर्थीला सकाळी अंघोळ झाल्यावर गणपतीची पूजा करावी.
- दिवसभर उपास करावा. 
- पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले गेले आहे.
- पूजा करताना मुख पूर्वीकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे.
- हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन व्रत संकल्प घ्यावे नंतर पूजा स्थळी एका चौरंगावर गणपतीची प्रतिमा स्थापित करावी.
- गणपतीला शेंदूर अर्पित करावे.
- गणपतीला फुलं, अक्षता, चंदन, धूप-दीप, आणि शमीचे पानं अपिर्त करावे.
- तुपाच्या दिव्याने आरती करावी.
- गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या.
- मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवावा.
- नंतर गणेश मंत्र जपावे.
- रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे. 
- नंतर गणपतीला दूर्वा अर्पित कराव्या आणि नैवेद्य दाखवावं.
- श्री गणेशला दूर्वा अर्पित करताना ओम गं गणपतय: नम: मंत्र जपावं.
- व्रत कथा वाचावी.
- शेवटी सर्वांना प्रसाद वितरित करुन चंद्रदर्शन घेऊन व्रत खोलावे.
 
तसेच काही विशेष इच्छा पूर्तीसाठी संकष्टी चतुर्थीला गणपतीला तांदूळ अर्पित करावे आणि लाल रंगाचं फुलं अर्पित करुन आपली मनोकामना पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करावी.
 
तसेच गणेश संकष्टी चतुर्थीला सकाळी अंघोळ केल्यानंतर गणपतीला 21 दूर्वाची माळ अर्पित केल्याने देखील अडकलेला पैसा परत मिळतो.
 
संकष्टी चतुर्थीला सकाळी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करुन गणपतीसमक्ष बसून तुपाचा चौमुखी दिवा लावल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती