दारिद्र्याला आमंत्रण देते फाटकी जींस

फेंगशुईमध्ये कपड्याचेही विशेष महत्त्व आहे. आम्ही कसे कपडे घालतो, कसे कपडे वापरतो या सर्व गोष्टींचा आमच्या जीवनावर खूप प्रभाव पडत असतो.
* हल्ली युवा वर्गात कट लागलेल्या जींस घालण्याची फॅशन आहे. परंतू फेंगशुईत याला वाईट मानले आहे. असे कपडे घालणे अर्थात दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखे आहे.
* तसेच सकाळी उठल्याबरोबर आपला नाइट सूट बदलून चांगले कपडे घालायला हवे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
* कपडे धुतल्यावर त्यांना नेहमी उन्हात वाळत घालायला हवे. याने कपड्यांमध्ये वाइब्रेंट एनर्जी येते.
* धुऊन वाळवायला घातलेले कपडे रात्रीच्या आधी घरात घेयला हवे. कारण रात्री नकारात्मक ऊर्जा असते. रात्री कपडे घराबाहेर राहिल्यास ती नकारात्मक ऊर्जा त्यावर येते आणि ते कपडे घातल्यावर त्याचा विपरित प्रभाव आमच्या शरीरावर पडतो.

वेबदुनिया वर वाचा