सध्या दिवाळीचा माहोल आहे तर या सणासाठी काही तरी एथनिक ट्राय केलं जातं. लवकरच लग्नसराईचा मोसमही सुरू होईल. लग्नाच्या निमित्ताने वेगवेगळे आउटफिट्स ट्राय केले जातात. पण एथनिक्स म्हटले की मुलांकडे मर्यादित पर्याय उरतात. कुर्ता आणि चुडीदार हा कॉमन पेहराव कॅरी केला जातो पण मुलांच्या एथनिक्समध्येही कूप व्हरायटी आहे. थोडंसं हटके, वेगळं काही तरी ट्राय केलं पाहिजे. एथनिक्सचे हे काही कूल ऑप्शन्स...
* नेहमीच्या स्ट्रेस कुर्त्याएवजी अनारकली ट्राय करता येईल. अनारकली म्हणून भुव्या उंचावल्या का? पण मित्रांनो, हा पॅटर्न मुलंही कॅरी करू शकतात. अनारकली कुर्ता आणि सोबत पँट कॅरी करता येईल. थंडीच्या दिवसात एंब्रॉयडरीवाला स्टोलही घेता येईल. या पेहरावामुळे तुम्हाला राजेशाही लूक मिळेल.
* फार झकपक लूक नकोय. सोबर, सिंपल असं काही तरी हवंय. पण त्यातही फॅशन हवी, डौल हवा असं वाटतंय का? मग तुम्ही छानसा प्रिंटेड कुर्ता कॅरी करू शकता. फ्लोरल प्रिंटचा ऑप्शन ट्राय करता येईल. पण यासोबत चुडीदार किंवा पटियाला घालू नका. काउल पँट घाला.