Spa Therapy स्पा थेरपी काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्या

बुधवार, 1 मार्च 2023 (19:03 IST)
सुगंधित औषधी स्नान ही परंपरा फार प्राचीन आहे. त्यालाच हल्ली 'स्पा' थेरपी असे म्हणतात. आजही तिचे महत्त्व कायम असल्याचे दिसते. हल्ली सौंदर्यवृद्धीसाठी 'स्पा' थेरपी अवलंबली जाते. प्राचीन काळी राजे-रजवाडे असे औषधी स्नान करत असत. मा‍त्र, आता मध्यवर्गीयही 'स्पा'चा अवलंब करू लागले आहेत.
 
'स्पा' थेरपी आहे तरी काय?
'स्पा' थेरपीमध्ये सुरवातीला डोक्यावर तेल टाकले जाते. डोक्यावरील तेल संपूर्ण शरीरावर उतरल्यानंतर त्याने संपूर्ण शरीर स्वच्छ केले जाते.
 
विविध प्रकारची फुले, सुगंधित वनस्पतीपासून तयार केलेला पॅक सर्वांगाला लावून मसाज केली जाते. त्यानंतर 'स्पा'च्या माध्यमातून बॉडी मसाज केला जातो.
 
मसाज केल्यानंतर काही मिनिटासाठी नैसर्गिक औषधांनी तयार केलेल्या स्टीम बाथ टबमध्ये बसवले जाते. 'स्पा' थेरपीच्या पूर्ण प्रक्रियेला 30 ते 40 मिनिटाचा कालावधी लागतो.
 
'स्पा' ट्रीटमेंटद्वारा चेहर्‍यावरील हरवलेली चकम पुन्हा मिळवता येते.
 
'स्पा' ट्रीटमेंटचे फायदे-
'स्पा' ट्रीटमेंटची किंमत 500 रुपयांपासून तर 10 हजार रुपयापर्यंत असते. या थेरपीच्या माध्यमातून स्पायनल डिसआर्डर, डायबिटीस, कंबरदुखी, मूत्र संबंधीत आजार, अस्थमा व अर्थराइटीस या सारख्या आजारावर उपाचार केला जातो.
 
'स्पा' ट्रीटमेंटमुळे डोके शांत राहते. शरीरालाही आराम मिळतो.
 
'स्पा' ट्रीटमेंट नैसर्गिक औषध आहे. या थेरपीच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक तणाव दूर केला जातो.
 
वर्षभरातून एकदा तरी बॉडी पालिशिंग किंवा 'स्पा' ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. त्याने शरीरिक संतुलन कायम ठेवले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती