महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी महाराष्ट्राचा वारसा आणि राजेशाहीचे प्रतीक आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरुन या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले.अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार येवला पैठणी ''पैठणी'' हा शब्द खास करुन अस्सल सोन्या-चांदीच्या जरीमध्ये व विशिष्ठ नक्षीदार विणलेल्या पदराच्या गर्भरेशमी साडीशी निगडीत आहे.
हा उत्कृष्ट पोशाख मराठी संस्कृतीचा पुरावा आहे. महिलांना सण आणि अनेक प्रसंगी ही साडी नेसायला आवडते. मात्र, वाढत्या मागणीमुळे त्याची शुद्धता कमी होत आहे आणि बाजारात बनावट साड्या उपलब्ध आहेत. या महागडी साडीची बनावट पैठणी साठी देखील खूप पैसे मोजावे लागते. शुद्ध आणि बनावट पैठणीची ओळख करण्यासाठी या ट्रिक्स अवलंबवा.
डिझाईन तपासा-
पैठणी खरी आहे की बनावट या साठी डिझाईन तपासा, शुद्ध पैठणीला स्प्ष्ट आणि भोमितीय आकार असतो. ग्रीडसारखे विणकाम असते. गुळगुळीत कडा आणि वक्र डिझाईन मशीनने बनवलेली साडीची ओळख आहे.
वजन तपासा-
पैठणी त्यांच्या जड वजनामुळे ओळखली जाते. त्यांच्यातील प्रीमियम सिल्कच्या धाग्यांमुळे ती जड होते. ही साडी परिधान केल्यावर सुंदर दिसतात. शुद्ध पैठणीची ओळख करण्यासाठी त्याचे वजन तपासा.
पैठणीची शुद्धता तपासण्यासाठी साडीची उलट बाजू तपासा. हाताने विणलेली शुद्ध पैठणी दोन्ही बाजूने परिपूर्ण असते. त्यात क्रॉस थ्रेडशिवाय स्वच्छ डिझाईन असते. हाताने बनवलेली पैठणी साडी मशीन ने बनवलेल्या साडीपेक्षा वेगळी असते. शुद्ध पैठणीची ओळख म्हणजे कधीकधी त्यातील धागे विखुरलेले दिसतात.
कपड्यांना स्पर्श करून तपासा -
शुद्ध आणि मूळ पैठणी उच्चतम दर्जाच्या रेश्मापासून बनवलेली असते. स्पर्श केल्यावर तिचा मऊ आणि गुळगुळीत स्पर्श होतो. खरा रेशमी खरखरीत आवाज करतो. साडीची शुद्धता तपासण्यासाठी साडीला स्पर्श करून रेशीमचा आवाज ऐका.
पैठणीची शुद्धता तपासण्यासाठी हॅन्डलूम मार्क लेबल शोधा. हे लेबल हाताने विणकाम केल्याचे दर्शवते. हे लेबल पाहून पैठणी हाताने विणल्याची खात्री देते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.