डेनिम आऊटफिट खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

शुक्रवार, 12 मार्च 2021 (09:15 IST)
सध्या जीन्सच्या व्यतिरिक्त डेनिमचे बरेच आऊटफिट्स पसंत केले जातात. हे खरेदी करताना काही गोष्टीना लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊ या . 
 
1 पॉकिटचे लक्ष ठेवा- 
बऱ्याच मुली डेनिम जीन्स घेताना पॉकिटची मागणी करतात. जर आपण जीन्स खरेदी करत आहेत तर मागील बाजूस पॉकिट असणे महत्त्वाचे आहे.या मुळे आपण सडपातळ दिसाल आणि जीन्सची शोभा वाढेल. 
 
2 स्ट्रेचेबल डेनिम आऊटफिट्स-
जीन्स असो किंवा कोणतीही स्ट्रेचेबल ड्रेस असो हे परिधान करायला सहज असते. जर आपण जीन्स खरेदी करत आहात तर ही आरामदायी आणि स्ट्रेचेबल असावी. विशेष करून स्किनी जीन्स घेताना.
 
3 साइजचे बघून घ्या-
डेनिमचे आऊटफिट्स शरीराच्या आकाराच्या अनुसार असावे. जर आपण जीन्स खरेदी करत आहात तर वेस्ट साइज बघून घ्या.आखूड किंवा मोठी जीन्स खरेदी करू नका. साइज व्यवस्थित नसेल तर दिसायला देखील चांगली दिसणार नाही. यासाठी साइज बघून जीन्स खरेदी करा. 
 
4 रंग निघण्याची भीती- 
बऱ्याच डेनिम कपड्यांचा रंग निघण्याची भीती असते. बऱ्याच वेळा रंग निघाल्यावर ते फिकट होतात आणि घालावेसे वाटत नाही. असं होऊ नये या साठी डेनिम मध्ये गडद रंग घेण्या ऐवजी फिकट रंग निवडावे. या मध्ये रंग जाण्याची भीती नसते. 
 
5 डेनिम जीन्स- 
या मध्ये तीन स्टाइल येतात लो,मिड आणि हाय. हे घालताना काही गोष्टींना लक्षात ठेवा की लो वेस्ट ही नाभीच्या खाली घालतात. मिडवेस्ट ही नाभी पासून घालतात आणि हाय वेस्ट जीन्स नाभीपासून 2 इंच वर घालतात. आपले पोट सपाट असल्यास आपण लोवेस्ट जीन्स सहज घालू शकतात. मिडवेस्ट आणि हायवेस्ट जीन्स आरामदायी आणि सहजरीत्या वापरली जाणारी असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती