* मोनोक्रोम व्हाईट लूक -
आपण व्हाईट टॉपसह मॅचिंग प्लाझो देखील घालू शकता. ऑफिस किंवा आउटिंग लूक ला वेगळे करायचे असेल तर एम्ब्रॉयडरी क्रॉप,ऑफ शोल्डर किंवा वन शोल्डर टॉपसह प्लाझो देखील घालू शकता. आपण पांढऱ्या मोनोक्रोम लुकसह फिकट जांभळी, गुलाबी किंवा पीच रंगाचे आयशॅडो आणि लिपस्टिक छान दिसेल.
* पांढरा शर्ट विथ लेदर स्कर्ट -
आपण पांढऱ्या रंगासह लेदर स्कर्ट किंवा पॅन्ट घालण्याचा विचार करत आहात तर यासाठी आपण लाल किंवा काळ्या रंगाची निवड करू शकता. या लाल आणि पांढऱ्या सह लाल लिपस्टिक लावू शकता. गडद आय मेकअप करणे टाळा कारण लाल स्कर्ट आधीच उठून दिसते. या ड्रेस वर आपण सोनेरी लेयर्ड नेकपीस आणि इयरिंग घालून पार्टी लूक देऊ शकता.
* पांढरा ड्रेस आणि सिल्व्हर दागिने-
आपण पांढऱ्या रंगाच्या ड्रेस किंवा साडीसह सिल्व्हर ज्वेलरी घालू शकता. या वर आपण रेड,पिंक किंवा पीच रंगाची लिपस्टिक लावल्यावर सुंदर दिसाल.