डस्टर जॅकेट दिसे खास

शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018 (12:10 IST)
पारंपरिक कपड्यांना 'वेस्टर्न' तडका लावायचा असेल, तर डस्टर जॅकेटचा वापर करता येऊ शकतो. कोणत्याही लूकसोबत तुम्ही हे जॅकेट कॅरी करू शकता. ही जॅकेट्‌स कोणत्याही ड्रेसवर फिट बसतात. पारंपरिक कपड्यांवर घाला किंवा वेस्टर्नवर त्याचा प्रयोग करा. जीन्स, स्कर्ट, मॅक्सी ड्रेस, गाउन किंवा कुर्त्यांवरही त्याचा वापर करता येतो. फुल स्लीव्ह, स्लीव्हलेसमध्येही ही जॅकेट्‌स आहेत. हेवी, बोल्ड आणि लाइट प्रिंट असलेली जॅकेट्‌स वेगवेगळ्या मोसमांत वापरता येतील. कॉलेज किंवा ऑफिसवेअर, पार्टीवेअरबरोबरही ही जॅकेट वापरता येतात. 
 
लेहंग्यासोबत थोडे हेवीवर्क असलेले डस्टर जॅकेट घालावे. आउट‍फिट लक्षात घेता त्यात फ्रिल, लेअर्स, स्ट्रेट कट अशा प्रकारातील जॅकेट निवडावे. लेहंग्यासोबत एम्ब्रॉयडरी, ब्रोकेड वर्क, सिल्कसारखं फॅब्रिक वापरता येईल. पार्टीत स्लीम फिट, शॉर्ट ड्रेस घालत असणार, तर ही जॅकेट स्टायलिश आणि स्मार्ट लूक देतील. हॉट पँट, शॉर्ट स्कर्टशीही ते पेअर करू शकता. प्लस साइज असेल, तर डस्टर जॅकेट उत्तम पर्याय आहे. किटी पार्टीमध्ये स्कीन फिट टी-शर्ट आणि जीन्स घालण्याची इच्छा असेल, तर डस्टर जॅकेट घालावे. त्यामुळे कंबर आणि हिप्सवरील फॅट्‌स लपवता येऊ शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती