आईने एक क्षणही विचार न करता दारं उघडलं आणि अंगणात जाऊन दोन्ही हात पसरवून उभी झाली. धो धो पाऊस अंगावर पडू लागलं आणि आत्मा तृप्त होत होती. तेवढ्यात हे काय तर फुटबॉलचा आवाज येऊ लागला.... मन्याचं लक्ष वेधलं गेलं. फुटबॉल वर केवढा जीव होता त्याचा.. किती हठ्ठ केल्यावर वडिलांनी दहाव्या वाढदिवसाला आणून दिला होता...आता फुटबॉल आवाज ऐकताक्षणी बाहेर नजर पडली तर आई पूर्ण भिजलेली आणि हातात फुटबॉल आणि तिची हास्य स्मित आणि हसरे डोळे मन्या जणू पहिल्यांदाच बघत होता. नाही तर घरात किंवा अंगणात फुटबॉलचा आवाज जरी केला तरी चिडायची... जा ग्राउंडवर जाऊन खेळ...