साडी नेसण्याचे ५ वेगवेगळे प्रकार

मंगळवार, 28 मे 2019 (11:27 IST)
असं म्हटलं जात कि 'बदल नियमित असतो' परंतु जेंव्हा फॅशनचा विषय येतो तेंव्हा ते खरं ठरत नाही. अनेक शतकापासून पारंपरिक साडीचा ट्रेंड आजही कायम आहे. साडी हे असे वस्त्र आहे जे स्त्रियांची सुंदरता वाढवतेच आणि कालमर्यादा दर्शविते, भारत कांजीवारम, बनारसी, पैठणी अशा विविध प्रकारच्या साड्यांचे भांडार आहे.     
 
खरं तर साडी कोणत्याही शरीराच्या प्रकारांवर शोभून दिसते, जर चांगली टेक्निक वापरून नेसली तर कोणतीही महिला यामध्ये स्लिम दिसू शकते. साडी नेसण्याची अनेक प्रकार आहेत; तथापि काही विशिष्ट स्टाइलसाठी आकार, लांबी आणि डिझाइनच्या साडीची आवश्यकता असते. साडी ही सर्वात जुनी तरीही मोहक असणारे पोशाख आहे. तरीही संगळ्यांनाच चांगला प्रकारे साडी नेसता येतेच असे नाही.
 
नोंदणीकृत ८० प्रकारांपेक्षा अधिक पद्धतीने साडी नेसता येऊ शकते. कमरेला गुंडाळून खांद्यावरून पदर काढून खालच्या भागात सैल गोलाकार घेर सोडणे हि सर्वात सामान्य पद्धत आहे. एका साडी बरोबर, तुम्ही  वेगवेगळ्या प्रकारे लुक आणि स्टाईल प्राप्त करू शकता! तुम्ही प्रयत्न केल्यास नक्कीच स्लिम फिट साडी तुम्हाला नेसता येऊ शकते. 
 
आज जाणून घेऊया पारंपरिकसह वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीने साडी नेण्याचे महत्वाचे ५ प्रकार.
१.स्कार्फ / नेक रॅप स्टाईल:
स्कार्फ / नेक रॅप स्टाईल हे केवळ आधुनिक आणि स्टाइलिशच नाही तर,थंड हवेच्या ठिकाणी किंवा हिवाळ्यामध्ये साडीचा हा प्रकार शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो.
 
पद्धत:
नेहमी सारखा साडीला पदर काढण्या ऐवजी, पदराचा वेगवेगळ्या पद्धतीने स्कार्फ सारखा वापर करा. 
 
जेंव्हा तुम्हाला तुमची साडी तुमच्या गळ्याभोवती गुंडाळायची असेल, तेंव्हा जसा ट्रेंड चालू असेल त्या प्रमाणे करावे. नेक बेल्ट किंवा इतर ऍक्सेसरीज जोडाव्या, जेणेकरून ग्लॅमरस लुक मिळेल.
२. केप स्टाइल
हि एक साडी नेसण्याची वेगळी पद्धत आहे, गळ्या पासून ते छाती पर्यंत गोलाकार पद्धतीचा पारदर्शक फॅब्रिकचा विणलेला केप असतो, त्याला केप स्टाईल साडी म्हणतात.
 
पद्धत:
थोडासा ग्लॅमरस लुक देण्यासाठी हा योग्य प्रकार आहे. तुम्हाला जी हवी ती साडी घ्या आणि तुमच्या निवडलेल्या साडी सोबत मॅच होईल असे एक केप घ्या. तुमच्या गळ्यामध्ये केप घाला, तुमचा गळा ते छाती म्हणजे तुमचा ब्लाउज झाकला जाईल याचा प्रयत्न करा. जरी ब्लाउज झाकला जात असला तरी पारदर्शक केप मुळे तुमचा ब्लाऊजही त्यातून उठून दिसेल. वेगवेगळ्या डिझाईन आणि एम्ब्रॉडायरीचा केप तुम्हाला आकर्षक लुक देण्यास मदत करेल.
३. बेल्ट स्टाईल
बेल्ट साडी हा प्रकार आपल्या पारंपरिक कमर पट्टा, नववधूच्या साडीवर आधारित आहे. यावर पातळ, रुंद किंवा कापडी बेल्ट देखील वापरला जाऊ शकतो.
 
पद्धत
आपल्या साडीला सामान्यपणे ड्रेप करा आणि तुमच्या कमरेवर बेल्ट घाला. तुम्हाला अधिक पारंपारिक लुक  हवा असल्यास तुम्ही कमरबंध किंवा कमर पट्टा वापरू शकता. या साडीवर ऑफ शोल्डर किंवा इतर स्टाइलचे ब्लाउज वापरू शकता. यामध्ये तुम्ही पदर हि बेल्टला जोडू शकता.
४. धोती स्टाईल
पुढच्या वेळी जेव्हा आपण लग्न समारंभात जाणार असाल उपस्थित रहाल तेव्हा हे ऑफबीट पहा. धोती स्टाईल साडी ही पँट स्टाईल साडी सारखीच असते आणि हि साडी परंपरा आणि आधुनिकतेचे सुंदर मिश्रण आहे. उत्कृष्ट साडी ड्रेपिंगसह सहज कॅरी करणाऱ्या सामंथा, शिल्पा शेट्टी आणि सोनम कपूर यांच्यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी धोती साडी लोकप्रिय केली आहे.
 
पद्धत                       
चांगल्या ड्रॅपिंगसाठी आपण पेटीकोट ऐवजी लेगिंग वापरू शकता. थोडीशी धोती स्टाईल आहे, परंतु नेसवणे आणि सजवणे अतिशय सोपे आहे. १ ते २ मीटर साडी कमरेच्या भोवती गुंडाळा, पदर काढू नका. आता डावीकडील आणि उजवीकडील भाग दोन्ही मागच्या बाजूने काढून ते पिन करून घ्या, ज्यामुळे धोती सारखा आकार दिसेल. तिथून ३ ते ४ प्लेट्सचे पदर काढून ब्लाउजवर वर पिन करा. पदर शक्यतो लांब असु द्या. यामध्ये प्रिंटेड साडी टाळा, कारण त्यामुळे धोती स्टाईल स्पष्ट दिसत नाही. प्लेन कलरमध्येच साडी निवडा.
५. जलपरी स्टाईल:
मुमताज साडी आणि लेहेंगा साडीबरोबर तुम्ही जर मर्मेड स्टाईल (जलपरी) साडीची तुलना केली तर येथे जास्त फरक जाणवत नाही. सर्व काही एकसारखेच वाटते, परंतु जेव्हा तुम्ही पदर पुन्हा ड्रेप करता तेंव्हा त्यात जो बदल येतो तो लक्षणीय असतो.
 
पद्धत
या ड्रेपिंग स्टाइलमुळे प्लेटसचा खालचा भाग बाहेर पसरतो, ज्यामुळे त्याचा आकार एखाद्या  माश्याच्या शेपटी प्रमाणे दिसतो. बघून असं वाटत कि या साडीवर खूप मेहनत करावी लागत असेल,  परंतु केवळ काही अतिरिक्त टक्स आणि प्लेट्स आवश्यक आहेत. ह्या साडीचे पदर इतर कोणत्याही साडीपेक्षा अधिक पटकन दिसते. म्हणून मोठा, भरजरी आणि नक्षीकाम काम केलेला पदर निवडा.

लेखक: रिहा सय्यद, फॅशन फॅकल्टी, फॅशन डिझाइन डिपार्टमेंट, आयटीएम आयडीएम

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती