Summer Beauty Tips: ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा हेल्दी डायट आवश्यक

उन्हाळ्यात घरातून बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो. उन्हात नाजुक त्वचेवर जळजळ होते आणि लाल डागदेखील पडू शकतात अशात आज आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगले राहील आणि सौंदर्यप्रसाधने प्रॉडक्ट्सवर निर्भरता कमी.
 
त्वचेच्या आरोग्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा हेल्दी डायटची अधिक आवश्यक आहे. त्वचेचं तारुण्य टिकून राहावं म्हणून प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे. याने त्वचेवर एक सुरक्षा परत तयार होते.
 
योग्य आहार
बीन्समध्ये जिंक आणि हायड्रोलिक अॅसिड आढळत ज्याने त्वचेत कोलाजन पातळी राखण्यास मदत मिळते. 
 
गाजरामध्ये व्हिटॅमिन्स ए भरपूर प्रमाणात आढळतं. याचे सेवन केल्याने पिंपल्स, पुरळ यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेत रक्त संचार योग्य रित्या होतं.
 
शाईनी स्कीनसाठी आहारात ओमेगा-3 फॅटी अॅसिड सामील करावे. मासे सेवन करणे त्वचा आणि केस दोघांसाठी फायदेशीर ठरतं.
 
ब्लूबेरीमध्ये अधिक प्रमाणात अॅटीऑक्सीडेंट्स आढळतं. ब्लूबेरीजचे सेवन केल्याने त्वचा खूप काळ सॉफ्ट राहते. याने हृद्यासंबंधी तसेच कर्करोग या सारखे आजार देखील टाळता येऊ शकतात. 
 
उन्हाळ्यात आपल्या आहारात लाल शिमला मिरच्या, टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीज सामील करा. याने त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती