ब्रँडेड कपडे खरेदी करताना या पद्धतीने तपासणी करा

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (19:45 IST)
फॅशन च्या या युगात ज्याला बघा त्याला स्टाइल मध्ये प्रथम क्रमांकावर राहायचे आहे. तरुणांमध्ये तर ब्रँडेड कपडे खरेदी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.ज्याला बघा तो आपल्या कपड्यांना आणि शूजला घेऊन जागृत आहे, परंतु बऱ्याच वेळा असं होत की ज्या वस्तूंना आपण ब्रँडेड म्हणून खरेदी करतो त्या प्रत्यक्षात बनावट असतात. ब्रँडेडच्या नावाखाली आपली फसवणूक केली जाते. खरं तर बाजारपेठेत ब्रँडेड कपड्यांमध्ये बऱ्याच प्रत मिळतात की अशा वेळी खरेदी करताना चुकून फसवणूक होऊ शकते. ब्रँडेड कपड्यांमध्ये अशी अनेक वैशिष्टये असतात ज्यांची कोणीही कॉपी करू शकत नाही. आज आम्ही सांगत आहोत काही असे खास वैशिष्टये, जेणे करून आपण ब्रँडेड कपड्यांची ओळख सहजपणे करू शकाल.
 
1 स्टिचिंग किंवा शिलाई -
आपण ब्रँडेड कपड्यांच्या शिलाई कडे लक्ष देऊन ओळख करू शकता. की ते खरे आहे की बनावट. ब्रँडेड कपड्यांची शिलाई सरळ, नीटनेटकी आणि एकसारखी असते. शिलाई मध्ये वापरले  जाणारे धागे-दोरे देखील एकसारखे असते. लावलेल्या बटणांवर  ब्रँडचे नाव लिहिले असते. ह्याचा अर्थ असा नाही की हे सामान्य आहे हे ब्रँडेड बटण आहे.
 
2 झिप -
ब्रँडेड कपड्यांची झिप गुळगुळीत आणि चांगल्या प्रतीची असते, बनावट असलेल्या कपड्यांची झिप मधून अडकते त्याची गुणवत्ता कमी असते. झिप ने ब्रँडेड कपड्यांची ओळख करणे सहज शक्य आहे. ते चटकन उघडा आणि बंद करा. असं केल्यानं आपल्याला लक्षात येईल. एक आणखी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की बऱ्याच ब्रँडेड कपड्यांच्या झिपवर ब्रँडचे नाव लिहिलेले असतात.
 
3 बटण-
ब्रँडेड कपडयांच्या बटणांवर ब्रँडचे नाव लिहिलेले असतात. तर कॉपी केलेल्या कपड्यांवर साधारण बटणं लावतात. पुढच्या वेळी खरेदी करताना बटणांवर देखील लक्ष द्या.
 
4 लोगो -
बऱ्याच वेळा कपड्यां वरील ब्रँडचा लोगो बघून गोंधळ होतो. लोगो बघून कपड्यांची ओळख करणे कठीण होते. आपण आपल्या मोबाईल वर त्या ब्रँडचा लोगो बघून त्या उत्पादनाच्या लोगोशी जुळवू शकता. लोगोची फॉन्ट स्टाइलने देखील आपण  हे ओळखू शकता की हे खरं आहे की बनावट.
 
5 टॅग्स- 
सहसा, ब्रँडेड कपडे खरेदी करताना त्यांच्या टॅग्ससह त्यांना ओळखतो,परंतु बाजारपेठेत त्यांच्या बनावट कपड्यांवर हूबेहू तसेच टॅग्स लावून विकले जातात.बरेच ब्रँड असे आहेत जे कपडयांच्या लायनिंग वर टॅग्स लावतात ज्याच्या साहाय्याने त्यांची खरी ओळख होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती