साडी मध्ये सडपातळ आणि उंच दिसण्यासाठी असा ब्लाऊज आणि केश रचना ठेवा

शनिवार, 30 जानेवारी 2021 (09:15 IST)
साडी नेसायला सगळ्यांना आवडते परंतु बऱ्याच वेळा लोकांना असं वाटते की त्या साडी मध्ये जाड दिसतील. बऱ्याचवेळा साडी चुकीच्या पद्धतीने नेसल्यानं तर कधी चुकीच्या फॅब्रिकची निवड केल्यानं देखील साडीमध्ये जाड दिसू शकता. या साठी साडीची निवड तर योग्य हवीच परंतु त्यावरील ब्लाऊज आणि केशसज्जेची निवड देखील योग्य असावी.
 
 ब्लाऊज घालण्याची पद्धत -
ब्लाऊज घालण्याची पद्धत आणि त्याचे डिझाइन बरेच काही दर्शवते.
 
* हेवी नॅक नसून हेवी बॅक असावे -
नॅक लाइन जास्त डीप किंवा हेवी एम्ब्रायडरी असण्याच्या ऐवजी बॅक कडे लक्ष द्यावे. जुडा बनविणारं असाल तर हेवी बॅक आणि डीप कट असलेले बॅक डिझाइन चे ब्लाऊज घाला. जे पातळ बॅक असण्याचा भास देतात. लक्षात ठेवा की इथे पूर्ण दोरी असणारे बॅक चांगले दिसणार नाही कारण कदाचित आपल्या पाठीची चरबी जास्त असू शकते.इथे वर्तुळाकार बॅक डिझाइन वर दोरी किंवा हूक लागलेला असावा आणि खाली पातळ स्ट्रिप्स असल्यास छान दिसेल
 
* लांब बाहीचे ब्लाऊज -
 
   3/4 बाह्या स्लीव्ज किंवा पूर्ण बाह्या किंवा थोडे लांब स्लिव्ह्ज असलेल्या ब्लाऊज मध्ये बाह्या सुबक दिसतात. अशा स्लीव्ज मध्ये बाह्यांवरील फॅट लोंबकळतं दिसून येत नाही आणि आपल्याला जास्त त्रास देखील होतं नाही. हे दिसायला लांब असतात म्हणून आपल्याला हे लक्षात असावे.
 
 केसांची रचना अशी करा- 
 
* केसांना पुढे ठेवा- 
जर आपण केसांना मोकळे ठेवणार आहेत तर केस मागे नाही तर फ्रंट साइड ला ठेवा. जेणे करून नॅक फॅट कमी दिसेल. साइड यामध्ये केस मोकळे सोडणे देखील छान लूक देईल आपण केसांना स्ट्रेट किंवा कर्ल  करू शकता. जर केस लांब आहे तर त्यांना फ्रंट साइड मध्ये ठेवणं चांगले राहील.
 
* जुडा किंवा अंबाडा घालत असाल तर-
जुडा किंवा अंबाडा बनवताना कोणत्या प्रकारच्या हेयर ऍक्सेसरीचा वापर करावे. या मुळे लक्ष मानेवर न जाता त्या ऍक्सेसरी वर जाईल लक्षात ठेवा की असं दर्शवायचे आहे की आपण सडपातळ आहात .हे दर्शविण्यासाठी ही सोपी पद्धत असू शकते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती