फॅशनमध्ये आहे बेल्ट बॅग

ट्रेकिंग, लांबचा प्रवास, जिम, मॉर्निंग वॉक किंवा अगदी मंडईत जातानाही मोबाइल, पैसे, सामानाची यादी, प्रवसाची तिकिटे यासारखे साहित्य ठेवण्यासाठी साइड पाऊचचा चांगला उपयोग होतो. मुलांमध्ये सध्या त्याची जोरदार फॅशन आहे. मुलींच्या बॅग्जमध्ये खूप व्हरायटी पाहायला मिळतात पण मुलांसाठीही बॅग्ज, साइड बॅग्ज, रकसॅक, कंबरेला बांधायचे साइड पाऊच, बेल्ट्स अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत.

 
WD

कंबरेला बांधायच्या साइड पाऊचमध्ये सध्या चांगलेच वैविध्य पाहायला मिळते. ही फॅशन फक्त कॉलेजीयन्समध्येच नाही, तर ट्रेकर्स, जिमला जाणार्‍या मंडळींतही लोकप्रिय ठरतेय. घराची किल्ली, रुमाल किंवा नॅपकीन, मोबाइल, थोडेसे पैसे, चालता चालता चघळायला एखाद - दोन गोळ्या असे साहित्य सहज मावू शकते. यात ट्रेनची किंवा बसची तिकिटे, छोटा डिजिकॅम, टॉर्च, सुरी, एखादे छोटे फळही सहज मावू शकते.

वेबदुनिया वर वाचा