यंदाच्या पोलीस भरतीसाठी फक्त मैदानी चाचणीमध्ये बदल करण्यात आले आहेत, तर लेखी परीक्षेचे नियम आहे तसेच राहणार आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे लेखी परीक्षेचे विषय आहेत. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही मैदानी चाचणी देऊ शकणार आहात.