Recruitment process of Forest Department मुंबई, वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेदरम्यान काही बाह्य हस्तक्षेप, उमेदवारांना नोकरी देण्याची आमिषे देणे, अफवा पसरविणे, अपप्रचार करणे अशाप्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास त्याविरुद्ध तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन महसूल व वन विभागाने केले आहे.