Maharashtra Talathi Recruitment 2023 : महाराष्ट्रात तलाठी 4644 पदाच्या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु

सोमवार, 26 जून 2023 (12:16 IST)
Maharashtra Talathi Recruitment 2023 : राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या 36 जिल्ह्यांतील  4644 पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी पदासाठी आज पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. 17 जुलै अर्ज भरायची शेवट्ची तारीख आहे. 
या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून एक उमेदवार एकाच जिल्ह्यातून अर्ज भरू शकतो. 
 
साधारण वर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये असणार तर आरक्षित राखीव वर्गासाठी अर्जशुल्क 900 रुपये असणार. 
या पदासाठी वयोमर्यादा खुल्या गटासाठी 38 वर्ष असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा 43 आहे. 
या पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा असून 2 तासांची परीक्षा असून 200 गुणांचा पेपर असेल. 
या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराने पदवी घेतलेली असावी तर हिंदी आणि मराठी विषय असणं बंधनकारक आहे. 
राज्यभरात  महसूलविभागांतर्गत तलाठी (गट -क) संवर्गातील 4644 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती