रेल्वे भरती 2021 : 10वी उर्त्तीण उमेदवारांसाठी 2200 हून अधिक पदांवर भरती, परीक्षेची गरज नाही

शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (13:34 IST)
Railway Recruitment 2021 : ईस्ट सेंट्रल रेल्वेने ट्रेड अप्रेंटाइस पदांवर एकूण 2206 वैकेंसी काढल्या आहेत. ही भरती फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, पेंटर, मैकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिक, वायरमैन, रेफ्रिजरेशन व एसी मैकेनिक सह अनेक ट्रेड्ससाठी करण्यात येतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2021 आहे. अप्रेंटाइसच्या या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा इंटरव्यूह होणार नाही. ही भरती 10वी वर्गाच्या व आयटीआय कोर्समध्ये मिळवलेले मार्क्सच्या आधारावर होईल. दोन्हीच्या गुणांना समान वेटेज देण्यात येईल. या गुणांच्या आधारे मेरिट तयार करण्यात येईल. या मेरिटच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार rrcecr.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
 
पात्रता : पा‍त्रता प्राप्त संस्थान किंवा बोर्डकडून किमान 50 टक्के अंकांसह 10वीची परीक्षा उर्त्तीण असणे आणि पदाशी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त असणे गरजेचे आहे.
 
वय मर्यादा
- किमान 15 आणि जास्तजास्त 24 वर्षाहून कमी
- ओबीसी प्रवर्गासाठी वरची वयोमर्यादा तीन वर्षे, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिक अपंगांसाठी दहा वर्षे शिथिल केली जाईल.
 
स्टाइपेंड : नियमानुसार
अर्ज फीस - सामान्य श्रेणीच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागते. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
 
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नियोक्ता कोणत्याही प्रशिक्षणार्थीला नोकरी देण्यास बांधील नाही, किंवा प्रशिक्षणार्थी नियोक्त्याने देऊ केलेला कोणताही रोजगार स्वीकारण्यास बांधील नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती