नवोदय विद्यालय समिती (NVS)कडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु आहे. जवळपास दोन हजार पदांसाठी ही भरती असून 10 फेब्रुवारीच्या आधी या पदासाठी अर्ज करायचा आहे.
गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार नवोदय विद्यालय समिती भर्ती 2022 साठी अधिकृत वेबसाइट http://navodaya.gov.in वर 10 फेब्रुवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 12 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. यासाठी नवोदयच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. https://navodaya.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.
रिक्त पदांचा तपशील
सहाय्यक आयुक्त : 7 पदे
महिला कर्मचारी परिचारिका : 82 पदे
सहाय्यक विभाग अधिकारी : 10 पदे
लेखापरीक्षण सहाय्यक : 11 पदे
कनिष्ठ अनुवाद अधिकारी : 4 पदे
कनिष्ठ अभियंता : 1 पद
स्टेनोग्राफर : 22 पदे
संगणक परिचालक : 4 पदे
खानपान सहाय्यक : 87 पदे
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक : 630 पदे
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर: 273 पदे
लॅब अटेंडंट: 142 पदे
मेस हेल्पर: 629 पदे
मल्टी टास्किंग स्टाफ: 23 पदे
काय आहे पात्रता
ऑनलाइन परीक्षा, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ही ऑनलाइन परीक्षा 9 मार्च ते 11 मार्च 2022 या कालावधीत घेतली जाईल. इयत्ता 10वी आणि 12वी व्यतिरिक्त, पदवीधर उमेदवार नवोदय विद्यालयातील गट अ, गट ब आणि गट क पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे सेट केली गेली आहे, त्यामुळे उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
ऑनलाईन अर्जासाठी शुल्क किती?
सर्व पात्र उमेदवार NVS शिक्षकेतर कर्मचारी भरती 2022 साठी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सहाय्यक आयुक्त पदासाठी, उमेदवारांना 1500 रुपये आणि महिला स्टाफ नर्ससाठी 1200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, लॅब अटेंडंट/मेस हेल्पर/मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 750 आणि इतर पदांसाठी रु. 1000 भरावे अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.