12 एप्रिल रोजी ग्रामविकास विभागा कडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले. 16 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदांमध्ये थेट सेवा भरतीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी उमेदवारांची वयोमर्यादा दोन वर्षांनी शिथिल करण्यात आली.
तसेच, मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार, या परीक्षे साठी पूर्वी अर्ज केलेले सर्व उमेदवार देखील परीक्षेला बसू शकतील. असेही आदेशात म्हटले आहे. या संदर्भात येत्या काही दिवसांत सर्व जिल्हा परिषदांना त्यांच्या भरतीच्या जाहिरातीचा नमुना, आरक्षणनिहाय रिक्त पदे, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता यांची सविस्तर माहिती कंपनीला द्यावी लागणार आहे.भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा आयबीपीएस आणि टीसीएस या कंपन्या घेणार.