Job opportunity आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी

शनिवार, 12 ऑगस्ट 2023 (12:17 IST)
Job opportunity for 10th, 8th passed महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आठवी, दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती होणार आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणचे मनरेगाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख काय आहे? जाणून घेऊया या विषयी सविस्तर माहिती.
 
मनरेगाच्या ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येते. या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी संसाधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटीच्या पॅनलवर केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत संसाधन व्यक्ती पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
 
ही आहे शैक्षणिक पात्रता
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत होत असलेल्या या भरतीमध्ये संसाधन व्यक्ती या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदासांठी अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवारांच्या परीक्षा शुल्कात बचत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल.
 
अर्ज करण्यासाठी ही आहे अंतिम मुदत
मनरेगा अंतर्गत होत असलेल्या या भरतीसाठी 3 ऑगस्टपासून अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. तर 17 ऑगस्ट ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अर्जाचा नमुना, पदासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या कार्यालयाच्या www.aurangabad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानंतर उमेदवारांनी आपले अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो, जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती