एम टेक नंतर नोकरीची संधी

मंगळवार, 20 जुलै 2021 (21:19 IST)
मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंगची मास्टर्स पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या बर्याच संधी उपलब्ध होतात. मात्र अनेकजण अधिक चांगल्या संधींच्या अपेक्षेने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतात. एमटेक किंवा एमई केल्यानंतर विद्यार्थी नोकरी करू शकतात किंवा पीएचडी मिळवून पुढे जाऊ शकतात. अध्ययनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे, संशोधन क्षेत्रात जाणारे तसंच एखाद्या  कंपनीच्या विकासाला हातभार लाऊ इच्छिणारे विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी करू शकतात. एमटेकचा किंवा दुसरा कोणताही विषय घेऊन तुम्ही पीएचडी करू शकता. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या संस्था पीएचडी करणार्यान विद्यार्थ्यांना फेलोशिप्स देतात. यासोबतच विद्यापीठ अनुदान आयोगास इतर काही सरकारी विभाग, खासगी संस्थांकडून पीएचडीसाठी शिष्यवृत्ती मिळू शकते. याबाबत तुम्ही माहिती घेऊ शकता.
 
बीटेक आणि एमटेक केल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थी चांगल्या कंपनीत नोकरी बघतात. रिसर्च आणि डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी कंपन्यांसह विविध कंपन्यांमध्ये रिसर्चअसोसिएट, सीनियर इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजरसारख्या पदांवर काम करता येईल. देशात चांगल्या प्राध्यापकांची गरज लक्षात घेता तुम्ही या क्षेत्रातही जाऊ शकता. याशिवाय स्वतःची कंपनी सुरू करण्याचा विचारही करता येईल. सध्या स्टार्ट अप्सनाही चांगली मागणी आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती