कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) विविध केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये कॉन्स्टेबल जीडीच्या नियुक्तीसाठी वेळापत्रक जारी केले आहे. यासाठी 10 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत संगणकावर आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC-2022) अंतर्गत आता विविध केंद्रीय दलांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी-जीडी) रँकच्या 45 हजारांहून अधिक पदांची भरती केली जाईल.
यापूर्वी पदांची संख्या केवळ 24 हजार होती. आता बीएसएफमध्ये 20 हजार 765 पदे, सीआयएसएफमध्ये पाच हजार 914 पदे, सीआरपीएफमध्ये 11 हजार 169 पदे, एसएसबीमध्ये दोन हजार 167 पदे, आयटीबीपीमध्ये 1,787 पदे, एआरमध्ये 3,153 पदे आणि एसएसएफमध्ये 154 पदे भरण्यात येणार आहेत.
यासाठी इच्छुक उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून अर्ज आणि नियुक्ती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. आयोगाच्या म्हणण्यानुसार, ही भरती BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, SSF, आसाम रायफल्स आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये असेल.
कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) येत्या फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अंतर्गत, संयुक्त पदवी स्तर परीक्षा 2021 ची कौशल्य चाचणी 4-5 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. संयुक्त उच्च माध्यमिक परीक्षा 2021 साठी कौशल्य चाचणी 6 जानेवारी 2023 रोजी घेतली जाईल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, NIA, SSF आणि आसाम रायफल्समध्ये रायफलमॅन GD आणि कॉन्स्टेबल GD साठी संगणक आधारित परीक्षा 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होईल.
अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2022