GAIL Recruitment 2022: GAIL मध्ये या विविध पदांवर चांगल्या पगाराची नौकरीची संधी

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (11:58 IST)
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी  GAIL ने एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छित आणि पात्र उमेदवार  GAIL च्या अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया  15 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
 
याशिवाय, उमेदवार https://gailonline.com/home.html या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://gailonline.com/careers/currentOpnning/DETAILEDADVERTISE  या लिंकद्वारे अधिकृत गेल भर्ती 2022 अधिसूचना देखील पाहू शकता . 
 
या भरती प्रक्रिये अंतर्गत, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सची पदे भरली जातील.
 
 * महत्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख - 15 फेब्रुवारी 2022 सकाळी 11
ते ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 
 
*  रिक्त पद  तपशील
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी  (इंस्ट्रुमेंटेशन)
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मॅकेनिकल)
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल)
 
 * पात्रता निकष -
* एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) – उमेदवारांनी इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये किमान 65% गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
 
* एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (मॅकेनिकल ) – उमेदवारांनी किमान 65% गुणांसह मॅकेनिकल /प्रोडक्शन /प्रोडक्शन आणि इंड्रस्टीयल /मॅन्युफॅक्चरिंग/मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल मधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान या विषयात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
 
* एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (इलेक्ट्रिकल) - किमान 65% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समधील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
 
 * वयोमर्यादा-
उमेदवारांची वयोमर्यादा 26 वर्षे असावी.
 
* अर्ज फी-विनाशुल्क
 
 * निवड प्रक्रिया- 
GATE-2022 स्कोअरच्या आधारे ग्रुप डिस्कशन आणि  वैयक्तिक मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती