CISF मध्ये सैन्य सेवानिवृत्त सैनिकांसाठी भरती, 2000 पद रिकामे

शुक्रवार, 12 मार्च 2021 (11:28 IST)
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाने एक्स आर्मी जवान, सब इंस्पेक्टर, असिस्टेंट इंस्पेक्टर, हेड कॉन्सटेबल (GD) आणि कांस्टेबल (GD) पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. यासाठी निवडल्या जाणार्‍या उमेदवारांना एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टवर ठेवले जाईल. एका वर्षानंतर त्यांच्या प्रदर्शनाच्या आधारावर कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षांसाठी रिन्यू करण्यात येईल. आर्मीहून रिटायर्ड जवान दखील यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च आहे.
 
CISF ने एकूण 2000 पदांसाठी अर्ज मागविली आहेत, ज्यात सब इंस्पेक्टरसाठी 63 पोस्ट, असिस्टेंट सब इंस्पेक्टरसाठी 187, हेड कॉन्सटेबलसाठी 424 आणि कांस्टेबलसाठी 1326 पद सामील आहेत. 
 
अर्ज करणार्‍या उमेदवारांची वयोमर्यादा 50 वर्षे आहे. भरती प्रक्रिया इंडियन आर्मीत मागील पोस्टप्रमाणे निर्धारित केली जाईल. 
पे स्केल एसआय -40000 रुपये,
एएसआय -35000 रुपये, 
हेड कांस्टेबल - 30000 रुपये, 
कांस्टेबल - 25000 रुपये
 
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 
https://www.cisf.gov.in/cisfeng/recruitment/

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती