या मुलाचे नाव रायन टॉयज रिव्यू असे असून त्याचे यू-ट्यूब चॅनल अत्यंत लोकप्रिय आहे. करो़डो लोक त्याचे चॅनल पाहतात. रायन आणि त्याच्या कुटुंबियांकडून चालवल्या जाणाऱ्या या चॅनलमध्ये खेळण्यांचा रिव्यू केला जातो. जुलै 2015 मध्ये म्हणजे रायन 4 वर्षांच्या असताना हे चॅनल सुरू केले. आतापर्यंत खूप व्हिडिओज चॅनलवर अपलोड केले आहेत.
'जायंट एग सरप्राईज' या चॅनलला 80 कोटींहून अधिक व्यूज आले आहेत. त्याचबरोबर 10 मिलियन म्हणजे 1 कोटींहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. खेळण्यांबरोबरच लहान मुलांच्या फूड आयटमचे देखील येथे रिव्यू केले जातात.