‘ उडतरंग ’ २०१७ जे पी इन्फ्राची पतंग बनवा स्पर्धा

बुधवार, 11 जानेवारी 2017 (17:46 IST)
मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी, जेपी इन्फ्रा प्रा.लि. या एका आघाडीच्या मालमत्ता क्षेत्रातील विकासकाकडून मीरा रोड येथील ‘जेपी नॉर्थ’ या प्रोजेक्ट साईटवर १४ जानेवारीला ३ ते ७.३० या वेळेत ‘उडतरंग’ नामककार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

'उडतरंग 'मध्ये विविध स्पर्धाची रेलचेल असणार आहे ज्यात पतंग बनवणे, नेल आर्ट, टॅटू कलाकार, रस्त्यावरील जादू, छोटे खेळ, मकर संक्रांतीनिमित्त बनवले जाणारे खाद्यपदार्थ आणि इतर अनेक धमाल ष्टींचा मनमुराद आनंद या कार्यक्रमात घेऊ शकतात. 

या निमित्ताने, श्री. मनोज असरानी- उपाध्यक्ष, मार्केटिंग आणि विक्री म्हणाले की, “आम्ही जेपी नॉर्थचे उद्घाटन एका मोहिमेद्वारे सुरू केले. मागील काही महिन्यांमध्ये आम्ही सातत्याने प्रकल्पाच्या विविध घटकांवर काम केले जसे, नियोजन, नवीन क्लबहाऊस डिझाइन आणि इतर अनेक गोष्टी. आमचे खूप प्रयत्न आकाराला येत आहेत आणि आम्हाला हा वर्षाचा पहिला सण जेपी कुटुंब आणि आमच्या सर्व ग्राहकांसोबत साजरा करायचा आहे.” 

जेपी इन्फ्राबाबत
२००६ मध्ये स्थापना झालेली जेपी इन्फ्रा ही वेगाने महत्त्वाकांक्षी वाढीच्या योजना आणि तिला बाजारात आणायच्या असलेल्या विकासाच्या प्रकारांचे स्वप्न यांच्यासोबत वाढत आहे. विविध प्रकल्प विकसित होत असताना आणि अनेक प्रकल्प नियोजित होत असताना जेपी इन्फ्रा ही एक अशी कंपनी आहे जिला उज्ज्वल भविष्य आणि विकासाची दिशा आहे. मागील दशकाच्या काळात, या संस्थेने स्वतःसाठी दर्जा, कार्यक्षमता, विश्वास, कठोर नियोजन, उत्तम दर्जाच्या सुविधा, सुंदर डिझाइन्स, वेळेत पूर्तता, निश्चित ताबा आणि प्रकल्प ताब्यात देणे या बाबतीत एक स्थान निर्माण केले आहे.

वेबदुनिया वर वाचा