अंधांना ‍टीव्ही पाहण्याची क्षमता देणारे नवे तंत्रज्ञान

बधिर आणि अंधजनांना टीव्हीच्या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल अशा एका नवीन आणि क्रांतिकारी सॉफ्टवेअरचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. कोणालाही मध्यस्थाशिवाय आणि अगदी ताबडतोब टीव्हीवरील कार्यक्रमात काय चालले आहे हे समजावून सांगणारे एक नवीन सॉफ्टवेअर आहे पव्हेंस्विह.
 
सबपव्हेंसिव्ह सब हे सॉफ्टवेअर टीव्ही चॅनलवरील सर्व सबटायटल्स एकत्र करून मध्यवर्ती सर्व्हरकडे पाठवते. मध्यवर्ती सर्व्हर ही सबटायटल्स ब्रेल लिपीत रूपांतरित करून स्मार्ट फोन वा टॅब्लेट्सकडे पाठवतो. ही माहिती विविद ब्रेल लाइन्सना अनुरूप असून गती वापरकर्त्याच्या आवश्यकतेप्रमाणे कमीजास्त करता येण्यासारखी असते.
 
स्पेनमधील युनिव्हरसिडॅड कार्लोस 3 डि माद्रिद फेडरेशन ऑफ डेफ- ब्लाईंड पर्सन्स असोसिएशनच्या संशोधकांनी या सॉफ्टेवेअरची निर्मिती केली असून बधिर आणि अंधजनांच्या एका गटावर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे.
 
टीव्हीवरील कार्यक्रमांचा सबटायटल्सची ब्रेल लिपीत रूपांतर करण्याच्या त्यांच्या क्षमतेची त्याचप्रमाणे गती कमी अधिक करण्याच्या क्षमतेची त्यांनी प्रशंसा केली आहे. बधिरपणामुळे आणि अंधत्वामुळे अशा व्यक्तींना बाहेरील गोष्टींचे ज्ञान मिळवण्यावर प्रचंड मर्यादा पडतात, या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे त्यांची मोठीच सुविधा होणार आहे.
 
या सॉफ्टेवेरिचा वापर माद्रिदमधील स्पॅनिश भाषेतील अनेक चॅनल्सवर करण्यात आलेला आहे. स्पेनमधील इतर भागांमध्येही लवकरच याचा वापर सुरू करण्यात येणार असून सध्या ही सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

वेबदुनिया वर वाचा