चीनमधील 67 टक्के, अमेरिकेतील 58 टक्के, युकेमधील 56 टक्के, पाकिस्तानमधील 25 टक्के आणि भारतातील 50 टक्के तरुण पैसा बचत करतात. पैसा बचतीमधील इतर देशांतील तरुणांच्या तुलनेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
भारतातील बहुतांश तरुण पिढी नोकरीसाठी गाव किंवा घर सोडून मोठ्या शहराकडे स्थलांतरित होते. त्यातील 28 टक्के तरुण वर्ग शहरात भाड्याने राहतात. 30 टक्के तरुण वर्ग हा महागड्या हॉटेल्स, पार्टी किंवा मौजमजेसाठी तसेच कपड्यांवर पैसा खर्च करत असतो.