दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने 23 डिसेंबर 2024 रोजी व्यंकट दत्ता साईशी लग्न केले. उदयपूरमध्ये पार पडलेल्या या हायप्रोफाईल लग्नात फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित होते. लग्नानंतर सिंधू पुन्हा एकदा खेळात परतली आहे. ती 14-19 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंडिया ओपन 2025 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वसंध्येला या स्टार बॅडमिंटनपटूने सांगितले की, मला अजूनही जिंकण्याची भूक आहे, अजून खूप काही साध्य करायचे आहे.
सिंधूने इंडिया ओपनच्या पूर्वसंध्येला सांगितले की, मी सध्या बंगळुरूमध्ये प्रशिक्षक इरवान स्याह यांच्या देखरेखीखाली सराव करत आहे. जेमतेम दीड आठवडा झाला. मुळात तो महिला एकेरीचा प्रशिक्षक आहे आणि तो काही तरुण मुलांनाही प्रशिक्षण देत आहे. मला त्याच्यासोबत काम सुरू ठेवायचे आहे. प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील समजूतदारपणा खूप महत्त्वाचा आहे. वेळ लागेल. एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी आम्हाला काही सराव सत्रांची आवश्यकता असेल.