आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सर्व लोकांना आणि सरकारांना मानवाधिकारांचा आदर करण्याचे आणि लोकशाहीमध्ये अर्थपूर्ण सहभाग देण्याचे आवाहन करतो. लोकांमध्ये लोकशाहीची जाणीव करून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. दरवर्षी 15 सप्टेंबर या विशेष दिवशी लोकशाही जागृती वाढविण्यासाठी विविध ठिकाणी वादविवाद, चर्चा आणि परिषदासारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.