चष्मा घातल्यास नाही दिसणार चेहरा

मानव आपल्या फायद्यासाठी सतत तरर्‍हेच्या वस्तूंची निर्मिती करत असतो. यामुळे वेळेची बचत होते व त्याला सुरक्षाही मिळते. खाद्य पदार्थांपासून अंगावर परिधान केल्या जाणार्‍या अशा अनेक वस्तूंचा आपण रोजच वापर करतो. ब्रिटनमधील एका कंपनीने कॅमेर्‍याची नजर टाळण्यासाठी आता असाच एक अनोखा व खास प्रकारचा चष्मा तयार केला आहे.
 
हा चष्मा डोळ्यावर ठेवल्यानंतर संबंधित व्यक्तीचा चेहराच कॅमेर्‍यात दिसणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे चेहरा सीसीटीव्ही कॅमेर्‍यात अजिबात टिपला जाणार नाही. उलट चहर्‍याच्या जागी चमकदार प्रकाश दिसेल. या चष्म्यामध्ये कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या काचेचा वापर केला आहे.
 
या काचेच्या पृष्ठभागावर प्रकाश पडल्यानंतर तो परावर्तित होतो. अशा परिरिस्थतीत चष्मा परिधान केलेल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर प्रखर प्रकाश दिसतो आणि त्याचा चेहरा सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत नाही.
 
मात्र हा चष्मा घालून रात्रीच्या वेळी जॉगिंग करताना आणि सायकल चालविताना एकदम सुस्पे्ट दिसते. कारण या चष्म्याला मायक्रो प्रिस्मॅटिक रेट्रो- रिफ्लेक्टिव्ह उपकरणाच्या मदतीने बनविण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारातही तुम्हाला दिवसाएवढे स्पष्ट दिसते.

वेबदुनिया वर वाचा