पाणी हे जीवन आहे. हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत. पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही. सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. हे अमूल्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल. पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात. पाणी वाया जात या कडे कोणाचेच लक्ष नसते. अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात. त्यामुळे खूप पाणी वाया जात. असे करू नये. इथे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात.
पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार, शेती साठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर पीक पण नसेल मग आपण काय खाणार? आपल्या दैनंदिनी व्यवहार देखील पाण्यानेच होतात. पाणी आपल्या जीवनासाठी अति आवश्यक आहे माणूस आपल्या जीवनात काही नसेल तरी राहू शकतो पण प्राणवायू ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या शिवाय जगू शकत नाही पाणी प्रदूषणाच्या आजारांमुळे लोक मरण पावतात. म्हणून पाणी प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे.