प्रदूषण एक मोठी समस्या

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (12:22 IST)
विश्वाची सर्वात मोठी समस्या आहे प्रदूषण. भारतात देखील दिवसं दिवस प्रदूषण वाढतच चालले आहेत. माणसाने शिकून फार उन्नती केलेली आहे. विज्ञानाने फार प्रगती केली आहे. माणसाला सर्व सोयी दिलेल्या आहेत. पण त्याच्यासह प्रदूषण वाढविण्यात देखील ह्याचा मोठा वाटा आहे. 
 
माणसाने आपल्या स्वार्थासाठी निसर्गाशी खेळ केला आहे. निसर्गाचे देखील आपले काही नियम असतात. माणसाने खेळ करून त्याचे नियम मोडले आहे निसर्गाचे समतोल बिघडले आहेत. 
 
वाढणारी लोकसंख्या देखील प्रदूषणाला जवाबदार आहे. लोकांना राहण्यासाठी निवारा करण्यासाठी जंगल उद्ध्वस्त केले जाते. झाडे कापून वाट बनवतात. झाडे आपल्या वातावरणाला शुद्ध करतात. झाडे आपल्याला शुद्ध वारं देतात. त्यामुळे आपण निरोगी राहतो पण झाडं कापल्यामुळे आपल्याला शुद्ध हवा मिळत नाही आणि आजारपण वाढतात. 
 
वाहनांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे लोकांना श्वासाच्या समस्येला समोरी जावे लागत आहेत. त्या मुळे फुफ्फुसाचे आजार वाढले आहे. उद्योग आणि घरातून निघणाऱ्या घाण सांडपाण्यामुळे नदी आणि इतर पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात. एकेकाळी स्वच्छ राहणाऱ्या आपल्या नद्या आज बऱ्याच आजारांना आमंत्रण देतात. 

या मध्ये लोक कचरा, प्लॅस्टिकच्या बाटल्या, पाकीट टाकून नद्यांना घाण करतात. 
 
तसेच लोक इकडे तिकडे कचरा पसरवतात आणि सांडतात. सगळी कडे घाण करतात. या मुळे आजार पसरतात. डास, माश्या घाणीवर बसतात आणि मग तेच माश्या अन्ना वर बसून त्याला दूषित करतात आणि ते दूषित अन्न खाऊन लोक आजारी पडतात. 
 
उद्योग वाढल्यामुळे कारखान्यात मोठ्या मोठ्या मशिनी चालतात. त्यांचा मोठ्याने आवाज होतो तसेच रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनांचा कर्कश आवाज सर्वत्र प्रदूषण करतो. लग्न समारंभात वाजणारे मोठे मोठे स्पीकर देखील प्रदूषण वाढवतात. 
 
आपण आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला त्रास देत आहोत. हवेत धूर सोडून, मोठ्याने स्पीकरच्या आवाज करून आपण प्रदूषण वाढवत आहोत. माणसाने वाढवलेल्या प्रदूषणामुळे इतर प्राणी देखील त्याचा परिणाम भोगत आहे. काही प्राण्याच्या प्रजाती तर लुप्तच झाल्या आहे. 
 
विषारी गॅस मुळे आपल्या पृथ्वीचे तापमान वाढले आहे सर्व निसर्गाचे समीकरणच बदललेले आहे. अधिक उष्णता, अधिक हिवाळा, तर अधिक पाऊस, हिमालया वरील बर्फ देखील वितळत आहे. 
 
वाढते प्रदूषण संपूर्ण जगासाठी डोकं दुखी आहे. प्रदूषण वाढल्यामुळे सर्वानाच त्रास होतं आहे. संपूर्ण विश्व या साठी जागरूक होतं आहे. प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन, जल दिन, ओझोन दिन, पृथ्वी दिन, जैव विविधता दिन, साजरे करतात. प्रदूषण आपल्या पर्यावरणाला संपवत चालले आहे. याला रोखण्यासाठी आपल्याला काही कर्तव्य पार पाडायचे आहे. जेणे करून आपल्या वसुंधरेचे सौंदर्य तसेच राहो त्यासाठी आपल्याला आपल्या जवळचे परिसर स्वच्छ ठेवायचे आहे. झाडे लावावे. आपले परिसराला स्वच्छ आणि सुंदर ठेवून आणि लोकांना देखील स्वच्छतेचा मार्ग दाखवून आपल्या पृथ्वीला सुंदर करता येईल. त्यासाठी झाडे लावा झाडे जगवा.

जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला स्वच्छ आणि सुरक्षित जीवदायी निसर्ग द्यायचे असल्यास प्रदूषणावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. हे फक्त आपल्या साठीच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीसाठी महत्त्वाचे आहे. जेणे करून पृथ्वीवर जीवन असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती