रडू नका, देशाला तुमचा अभिमान आहे ....

स्मृति आदित्य

शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (18:09 IST)
अश्रू, देश, हॉकी, तुटलेलं स्वप्न... किती तरी रात्रींपासून पडणारं ते सोनेरी स्वप्न....देशाच्या राष्ट्रगीतावर अभिमानाने उभं राहण्याचं स्वप्न... अखेर मानवच तर आहेत... भावनांने भरलेले... मन भरुन आलं जेव्हा देशाच्या प्रमुखांनी त्याची स्तुती केली, सांभाळलं, आपलंस करुन घेतलं आणि प्रेमळ शब्दांनी जखम भरुन काढली.... 
 
रडू याणं साहजिक आहे, जेव्हा आमचं मन भरुन आलं तर त्या तर मैदानात होत्या आपल्या स्वप्न आणि मनोबलासह....स्वत:चं संपूर्ण दिल्यावरही जेव्हा काही हातातून सुटतं तर देशाच्या आशांचे पदक भावनांना ढवळून काढणे खूप सोपे आहे..... आपण देखील विचार केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की आपल्यासारखे हे सर्व देखील मानव आहेत, भावनांनी परिपूर्ण आहेत...
 
रडणं कमजोरी नव्हे तर मनुष्य असण्याचे लक्षण... भावनांच्या लाटा येत असल्याचे संकेत आहे...परंतु पंतप्रधान मोदींने म्हटलं तेही खरेच आहे की रडणे बंद करावं लागेल, देशाच्या गर्वानुभूती समजावी लागेल.... मोदींनी म्हटले की रडणे बंद करा, देशाला तुमचा अभिमान आहे. 
 
आपल्या देशाच्या प्रमुखांकडून हे शब्द ऐकणे आणि संपूर्ण देशात पराभवानंतरही कौतुकाचे वातावरण निर्माण करणे हे पदकापेक्षा कमी नाही.....
बदल दिसून येत आहे की आम्ही याला पराभव समजत नाहीये.... तरीही काही असहिष्णु विधाने बाण मारत आहेत, चुकांवर चर्चा करुन ज्ञान दिले जात आहे...
 
जरा विचार करा की इथंपर्यंत पोहचणे आणि स्वत:ला सिद्ध करणं काय एका दिवसाची बाब आहे... किती तरी स्वप्न दफन करावे लागले असतील... किती इच्छांचा गळा दाबावा लागला असेल, किती युक्तींपासून बचाव करावा लागतो, मग कुठेतरी असा दिवस येतो की तुमची निवड होते.... निवड झाल्यावरही त्या आनंदाने नाचू शकत नाही कारण आता कुठे खरी परीक्षा सुरु होते.... अजून अनेक टप्पे शिल्लक असतात... आणि अंतिम पायरी म्हणजे जेव्हा आपण खेळत खेळत पुढे वाढता, पायर्‍या चढत जाता.... आर्दश स्थापित करता... सन्मान मिळवता आणि मग तीच गोष्ट की प्रत्येक क्षणी आपलं सर्वकाही देत पदक जिंकण्याचा प्रयत्न करता ज्यांच्याशी देशाचा अभिमान जोडलेला आहे.
 
आपल्या ध्वजाला पुन्हा पुन्हा चुंबन घेण्याचा हा दिवस असतो परंतु कधी कधी दिवसाला दिसणारे तारे आमच्यासाठी ती चमक घेऊन येत नसतात जे रात्री आपले स्वप्न रोशन करतात... पण आम्हाला ती चमक धरुन ठेवायची आहे कारण जग यापुरतंच मर्यादित नाही... प्रवास केवळ इतकाच नाही.... अजून किती तरी ऑलिम्पिक येणार आहेत, किती खेळ जिंकायचे आहेत...
 
2020 ऑलिम्पिकचा सूर्योदय आज मंदावला असला .... नाव चमकू शकलं नसलं तरी हृदयावर अंकित छवी तर कायम राहील ....
 
एक सलाम, भारताच्या त्या शक्तींना, अटलजी यांच्या शब्दांसह की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता , टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, मन हारकर मैदान नहीं जीते जाते ना ही मैदान जीत लेने से मन ही जीते जाते हैं... मन जीत लिया है मैदान जीतने की अपार संभावनाएं अभी शेष हैं... आदमी को चाहिए कि वह परिस्थितियों से लड़े, एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती