घाबरू नका, वेळ आली तर सेनाभवन फोडू, लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

शनिवार, 31 जुलै 2021 (22:44 IST)
भाजपच्या वतीने माहिम विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाबाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक वादग्रस्त विधान केलं. ‘आम्ही माहिममध्ये आल्यावर शिवसेना भवन फोडण्याची भीती वाटते. घाबरू नका, वेळ आली तर सेनाभवन फोडू,’ असं प्रसाद लाड म्हणाले. 
 
प्रसाद लाड म्हणाले की, ‘भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे, हे आपण २०१४ निवडणुकीत त्यांना दाखवून दिलं होत. कारण त्यावेळेला जे भाजप होते आणि भाजपला मानणारा जो कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता, तो मतदार  देखील भाजपसोबत आहे. आता तर सोने पे सुहागा हुआ है. कारण राणे कुटुंबियांना मानणारा देखील स्वाभिमान पक्षाचा खूप मोठा गट आज राणेंच्या निमित्ताने भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला कार्यकर्ते नितेश राणे कमीच आणू. कारण आपण आलो की पोलीस खूप येतात. फक्त त्यांना सांगूया, ट्रेसमध्ये पाठवू नका, जेणेकरून आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण तुमची, आमची एवढी भिती की, यांना असं वाटतं, आता हे माहिममध्ये आले म्हणजे हे सेनाभवन फोडणारचं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू.’
 
पुढे प्रसाद लाड म्हणाले की, ‘मला सकाळपासून पोलिसांचे फोन येतायत. कार्यक्रमाला जाऊ नका. त्यांना म्हटलं, आम्ही कार्यक्रमाला जातो. आम्हाला दोघांचा अटक करून दाखवा. कारण आम्हाला अटक झाली, तर निश्चितपणे जिथे दगड पडायला पाहिजे, तिथे नक्कीच दगड पडणार. याच्यापुढे दक्षिण मुंबईमध्ये कोणताही मोर्चा असेल, मग तो युवा मोर्चा असेल, महिला मोर्चा असेल आणि खासकरून माहिममध्ये असेल तर मला आणि नितेशला बोलवायला विसरू नका. जसं नितेश यांनी तुम्हाला सांगितलं की, आम्ही आलो की ते पळून जाणार. त्यामुळे तिथे दंगलचं होणार. कारण शिवसेनेच्या कुंडल्या कोणाच्या कुठे आहेत आणि कुठली नाडी खेचली की कोण ट्याव करतो, ते आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे आज नितेश यांनी जे काही सांगितलं, त्याला तंतोतंत पुढे घेऊन जाण्याच काम करायचं आहे.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती