'ऑल वूमन १० नेशन्स' या दुचाकी राईडला मागील वर्षी मिळालेल्या भव्य यशानंतर आता 'बायकिंग क्विन्स'ने महिला सक्षमीकरणाचा संदेश जगभर पोहचविण्यासाठी आणखी एक तितकेच भव्यदिव्य पाऊल उचलले आहे. त्यासाठी ५०महिलारायडर्सनी१०हजारकिलोमीटरचा प्रवास करण्याचे ठरविले, असून गुजरात ते लडाखमधील खार्दुंग-ला हा प्रवास त्या दुचाकीवरून करणार आहेत. यादरम्यान त्या, महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहेत.
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते सुरतमधील पी. पी. सावनी विद्या संकुल येथे झेंडा दाखवून या प्रवासाला सुरूवात झाली. या सोहळ्याला महापौर अस्मिताबेन, खासदार सी़ आऱ पाटील, दर्शनाबेन जर्दोस, पोलीस आयुक्त सतिश शर्मा, जिल्हाधिकारी महेंद्र पटेल, प्राप्तिकर विभागाचे मुख्य आयुक्त अजय दास मेहरोत्रा, विभागीय महासंचालक शमसेर सिंग आणि जिल्हा विकास अधिकारी के. राजेश, लेफ्टनंट कर्नल सोहन रॉय आणि मान्यवर उपस्थित होते. 'ऑलइंडियाऑलवूमन' अशी यंदाची थिम आहे. या रायडर्स आता मुंबईत पोहचल्या आहेत.
या महिला रायडर्स १५राज्यांमधून प्रवास करणार असून, त्या खार्दुंग-ला या जगातील सर्वात उंचावरील रस्त्यावर पोहचतील आणि १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी तिरंगा ध्वज फडकवतील.
'सशक्त नारी सशक्त भारत' हे ब्रीदवाक्य या महिलांची प्रेरणा आहे. त्या १५ राज्यातील सुमारे पाच हजार गावांमधून जातील. त्यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू, नवी दिल्ली, चंदिगढ आणि राजस्थान यांचा समावेश आहे. प्रत्येक राज्यातील स्थानिक लोकांना भेटून त्या महिला सक्षमीकरणाचा संदेश देतील. वंचित मुलांना मदत करण्यासाठी त्या ९००० मुलांना शैक्षणिककिटचेवाटप करणार आहेत. त्याबरोबरच, महिलांना सॅनिटरीकिट्स देणार आहेत.
या मोहिमेदरम्यान, बायकिंग क्विन्सच्या हस्ते स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचासन्मान करण्यात येणार आहे.
बायकिंग क्विन्स या महिला रायडर्स गु्रपच्या संस्थापिका सारिका मेहता म्हणाल्या, ''आम्ही एकाच वेळी पॅशन आणि सामाजिक कारणासाठी हा प्रवास करत आहोत. आपल्या देशात महिलांना त्यांची चमक दाखविण्याची संधी खूपच कमी मिळते. त्याबाबतीत महिलांमध्येही एकप्रकारचा न्यनूगंड असतो. या प्रवासातून आम्ही महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जाणीव करून देणार आहोत आणि त्या कोणत्या क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात, याविषयची माहिती देणार आहोत. ''
परतीच्या प्रवासादरम्यान, आॅगस्ट महिन्यात त्या सर्वजणी नवी दिल्ली येथे पंतप्रधाननरेंद्रमोदी यांना भेटणार आहेत.
बायकिंगक्विन्सविषयी :
बायकिंग क्विन्स हा महिला रायडर्सचा सुरतमधील गु्रप आहे. व्यवसायाने मानसोपचार तज्ञ असणाऱ्या डॉ. सारिका मेहता या गु्रपच्या संस्थापिका आहेत. हा गु्रप २०१५ साली स्थापन करण्यात आला आणि दोनच वर्षात त्यांनी महिला व मुलांसाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी मागील वर्षी 'बेटी बचाव बेटी पढाव'चा संदेश देणाऱ्या ऑल वूमन टेन नेशन या मोहिमेचे देशातच नव्हे, तर जगभर कौतुक झाले. आपल्या पॅशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे या गु्रपचे ध्येय आहे.