रत्नानिधी चॅरिटेबल ट्रस्ट, एसिलर व्हिजन फाउंडेशन व टायटन आय प्लस यांचा एकत्रितपणे व्हिजन १०००० चा उपक्रम

गुरूवार, 28 जून 2018 (14:59 IST)
या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेचे कचरावेचक कर्मचारी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, बस चालक आणि मुंबई पोलिस याना १०००० चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
 
तसेच राज्य राखीव पोलिस दल मैदानात ६०० पोलिसांची मोफत नेत्र तपासणी  केली जाणार आहे.
 
मुंबई २७ जुन २०१८ : गुगल ऑर्ग ग्रांट, विकलांगांना साहाय्य आणि शिक्षण केंद्रित उपक्रम राबवणारी, मुंबई स्थित स्वयंसेवी संस्था रत्नानिधी चॅरीटेबल ट्रस्टद्वारे एसिलर व्हिजन फाउंडेशन आणि टायटन आय प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईकरांसाठी डोळ्यांचे आरोग्य जपणारा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत चांगल्या दर्जाचे १०००० पेक्षा अधिक चष्मे मोफत दिले जाणार आहेत.
 
मुंबईतील गोरेगाव येथील एस.आर.पी.एफ. मैदानात दिनांक २७ ते २८ जून या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत हे शिबीर आयोजित करण्यात आले असून या उपक्रमांतर्गत ६०० मुंबई पोलिस कर्मचार्‍यांची नेत्रतपासणी केली जाणार आहे.
 
या तपासणी शिबीरात टायटनच्या नेत्रतज्ज्ञांकडून उपस्थित व्यक्तीच्या डोळ्यांची तपासणी  केली जाईल. या तपासणीनुसार एसिलर व्हिजन फाउंडेशनद्वारे चष्म्याची लेन्स आणि रत्ना निधी कडून चष्म्याची फ्रेम या गोष्टी पुरवल्या जातील. अशा प्रकारे संपूर्ण तपासणी व त्यानुसार तयार चष्मा गरजूंना उपलब्ध करून दिला जाईल. पोलिस कर्मचार्‍यांच्या कुटुंबानादेखील या शिबीराचा लाभ घेता येईल.
 
व्हिजन १०००० या उपक्रमातील तपासणी शिबीराचे हे दुसरे सत्र असून नेत्र तपासणीचा मुख्य उद्देश यातून साध्य होत आहे. या उपक्रमातील पहिले सत्र २२ मे २०१८ रोजी रत्ननिधी संस्थेच्या महालक्ष्मी येथील वैद्यकीय केंद्रात पार पडले. पहिल्या तपासणी शिबीराचा लाभ घेतलेल्या व्यक्तींना चांगल्या दर्जाचे चष्मे १६ जुलै रोजी महालक्ष्मी येथील रत्ना निधी आणि रोटरी वैद्यकीय केंद्रात दिले जातील.
 
रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजीव मेहता यांनी याबाबत सांगितले की,
अशा सहयोगी दृष्टीकोनातून लाभणारे सकारात्मक सामाजिक परिणाम पुढे जाण्यास कायम प्रोत्साहन देत राहतात. व्हिजन १०००० हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याकरिता एसिलर आणि टायटन आय प्लस यांच्यासह काम करणं ही रत्ना निधीसाठी गौरवास्पद बाब आहे.
 
संदीप कर्णिक, डीआयजी (एस.आर.पी.एफ.), यांनी या उपक्रमाबाबत मत व्यक्त केले की, रत्नानिधीची ही सेवा परिपूर्ण अशी आहे. पोलिस कर्मचार्‍यांची केवळ नेत्रतपासणी न करता त्यावरील खबरदारीचा उपाय म्हणून चष्म्यांचे मोफत वितरणही या संस्थेद्वारे करण्यात येत आहे. आमच्या पोलिस कर्मचार्‍यांसाठी ही फार मोठी गोष्ट असून महाराष्ट्राच्या पोलिस दलातील सव कर्मचार्‍यांना याचा लाभ घेता यावा याबाबत आम्ही विचार करत आहोत.
 
व्हिजन१०००० या उपक्रमांतर्गत व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडिया, बाबुलनाथ यांच्या सहकार्याने रत्ना निधीद्वारे भविष्यात गरजूंकरिता नेत्र मोतीबिंदू ऑपरेशनची मोफत सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती