‘ये दिल माँगे मोअर‘ जेव्हा असे म्हणाले होते शहीद कॅप्टन बत्रा

26 जुलै अर्थात कारगिल विजय दिवस. तो दिवस जेव्हा 18 हजार फूट उंचीवर प्रचंड बर्फाळ प्रदेशात भारतीय जवानांनी का‍रगिलचं युद्ध जिंकलं. तब्बल तीन महिन्यांच्या प्रयत्नानांतर भारताचं ऑपरेान विजय यशस्वी झालं.
 
या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे 543 अधिकारी आणि जवान शहीद झाले. तसेच 1300 हून अधिक भारतीय सैनिक व अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. 
 
या युद्धात सुरवातीला लेफ्टनंट सौरभ कालिया यांना पाकिस्तानी सैन्याने कुठपर्यंत घुसखोरी केली आहे हे शोधून काढण्याची कामगीरी सोपविण्यात आली. पण ते सेनेच्या त्या सहा सैनिकांपैकी एक होते ज्यांचे क्षत-विक्षत मृतदेह पाकिस्तानने सोपावले होते.
 
कारगिल युद्धातील एक आणखी नायक म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. शेरशहा असे त्यांना हाक मारण्यामागे निश्चितच त्यांचा सिंहा इतका शुरपणा. केवळ दीड वर्षांपूर्वी भारती सैन्यात सामील झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी कारगिलचे पहिले शिखर जिंकले तेव्हा पुढे काय असे विचारल्यावर जेवढं जिंकलं तेवढं पुरेसं नाही आणि ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया त्यावेळी कॅप्टन बत्रा यांनी दिली होती.
 
त्यानंतर पॉइंट 5140 च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट जिंकला मात्र त्यात ते शहिद झाले. 
 
युध्दाआधीच, एकतर तिरंगा फडकवून येईन नाहीतर तिरंगा लपेटून येईन पण नक्की येईन. असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. या युद्धातले सगळ्यात पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले.
 
6 जुलै 1999 रोजी कारगिल युद्धात पॉइंट 5140, पॉइंट 4875, कारगिल (काश्मीर) येथील कारवाई दरम्यान दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला. ते भारतीय स्थल सेनेतील 13 वी बटालियन, जम्मू काश्मीर रायफल्स मध्ये कॅप्टन पदावरील अधिकारी होते.
 
बत्रा यांचे युद्धभूमीवरील शेवटचे उद्गार होते - जय माता दी !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती