पूजा हेगडेने तिचे वांद्रे येथे नवीन घर विकत घेतले आहे. हे घर 4000 स्क्वेअर फूटमध्ये बांधण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पॅन इंडिया स्टार पूजा हेगडेचे हे नवीन घर मुंबईतील एका पॉश भागात आहे. या घरातून तुम्हाला समुद्राचे विलक्षण दृश्य पाहायला मिळेल. याआधी अभिनेत्री शहरातील दुसऱ्या रहिवाशात राहत होती. मात्र, पूजा हेगडेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.