विंचवाच्या विषाची किंमत तब्बल 68 कोटी रूपये

अमेरिका- जगात जे काही थोडे महागडे द्रव पदार्थ आहेत त्यात लॉरस विक्वेस्यीयस या जातीच्या विषारी विंचवाच्या विषाचा समावेश असून हे विष लिटरला 10.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 68 कोटी रूपये दराने विकले जाते. या विषाचे वैद्यक शास्त्रात मोठे योगदान आहे.
 
तेल अवीव विद्यापीठातील प्रो. मायकेल गुरवेझ यांनी त्यांच्या टीमसह या विषावर केलेल्या संशोधनात हे विष वैद्यकीय ट्रीटमेंटसाठी खूपच उपयुक्त ठरल्याचे सांगितले. या संदर्भातला एक अहवाल 2013 साली प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालानुसार या विषातील काही घटक कॅन्सरपेशींच्या वाढीला थांबविण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.
 
हे घटक कॅन्सरपेशींची निर्मिती थांबवितात तसेच अवयव बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकदा नवीन बसविलेला अवयव रूग्णाचे शरीर स्वीकारत नाही हा धोका या विषामुळे टाळता येतो.
 
या विषातील काही घटक शरीराच्या प्रतिकारकशक्तीत काही सिंथेटिक बदल घडवितात व त्यामुळे नवीन अवयव स्वीकारण्यास शरीराकडून होत असलेला विरोध संपतो.
 
विंचवातून हे विष मिळविण्यासाठी त्याला करंट दिला जातो त्यामुळे विष त्याच्या नांगीत येते. एकावेळी फक्त दोन ते तीन थेंबच विष मिळते. त्यामुळे लिटरभर विष मिळविण्यासाठी हजारो विचवांचा वापर करावा लागतो व यामुळे त्याची किंमतही अधिक आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती