अमेरिका येथे रटगर्स विश्वविद्यालयाच्या शोधकर्त्यांनुसार अमेरिकेतून एकत्र करण्यात आलेल्या सिंदूरच्या 83 टक्के नमुने आणि भारतातून घेण्यात आलेले 78 टक्के नमुने यांच्या प्रति ग्राम सिंदुरामध्ये 1.0 मायक्रोग्राम लीड आढळला. तसेच न्यू जर्सी येथून घेतले गेलेले 19 टक्के नमुने आणि भारतातून घेतलेले 43 टक्के नमुने यांच्या अध्ययनात प्रति ग्राम सिंदुरामध्ये लीडचे प्रमाण 20 मायक्रोग्रामहून अधिक होती.
प्रोफेसर शेंडलप्रमाणे लीडची कोणतीही सुरक्षित प्रमाण नाही. हे आमच्या शरीरात मुलीच नसावे विशेषकरून 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या शरीरात तर मुळीच नाही. रिपोट्सप्रमाणे रक्तात लीडचे कमी प्रमाणदेखील आयक्यूला प्रभावित करतं. एवढंच नव्हे लीडमुळे शरीरात होणार्या नुकसानाला भरणे शक्य नाही म्हणूनच लीड वापरणे टाळणे आवश्यक आहे.